Friday, July 24, 2009

आई

आठवण तिची येता
काळिज माझ हेलावत ,
कुशीत आईच्या जाण्यास
मन माझ तळमळत ....!!

माझ ते लाडावन
आईच मात्र प्रेमानेच रागावन ,
इवल्या जिवासाठी आईच तळमळन
आंधार मिटवाया जस वातीच ते जळन ... !!

गुलाबाच्या फुलात ,पाकळ्यांच्या सुखात
आईन मला वाढवलय ,
प्रेम देत दुसर्‍यासाठी जगायाच
हेच "आई"न मला शिकवलाय ... !!


आई वीना जग सार पेटावस वाटत,
आयुष्या सार आईसाठीच जगावास वाटत.
मरून आई पोटी तेच बालपण
पुन्हा पुन्हा खेळावस वाटत ...!!

- By : Shyam Wadhekar

शिवजन्माची पहाट




Created By : Shyam Wadhekar Language : Marathi Description : This poems describes the first rising day of Maratha History , i.e the day of Chatrapati Shivaji's birth on fort shivneri.




शिवनेरीवर भगवा डौलान होता खेळत,
सूर्यकीरणेही गारव्याला होती जाळत,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत, पहिल मराठी पाउल ....!


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
'जिजाऊ'न साठवला होता,
आई भवानीस तोच अश्रू वाहून  
पोटी मराठ्यांचा धनी मागीतला होता ...!


मंदिर थराराली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍याखोर्‍यात दरवळली,
जिजाऊपोटी मराठ्यांचा राजा अवतरला 
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....!  



नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगराआड सांगत सुटला,
सह्याद्रीवर भगवा फडकनार 
मराठ्यांची तलवार आता शत्रूवर धडकनार ....!


ईतिहासाच पहिल पान 
शिवजन्मान लिहल गेल होत,
हिरव्या दगडांवर आता भगवे रक्त
हिंदवी स्वराज्याचा ईतिहास कोरत होत ....!


By : Shyam Wadhekar