Friday, July 8, 2011

स्वप्न बोलावतात मला...



जीवनात चालता चालता
खूप काही शिकलो,
स्वप्नांना पंख लावून
मनसोक्त उडान भरकटलो !!

प्रेमात कधी, मैत्रीत कधी
मासळिसा सळसळलो,
चालताना अनेकदा अडखळलो
त्यातूनही काहीतरी चांगलच शिकलो !!


आज मी लक्ष ठेवलय
सुर्यासारख तळपयच ठरवलाय ,
स्वप्न कधी ना कधी पूर्णच होतात
आज नाही तर उद्या
पण मागे पाहून जरूर बोलावतात
तू फक्त स्वताःवर विश्वास ठेव ,
सारे स्वप्न तुझ्या पायाशीच खेळतात !!



Written By: 
Shyam Wadhekar