Sunday, November 22, 2009

शिवप्रताप दिन

जय महाराष्ट्र !!

कोणी एकाने म्हटले आहे की "इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !! " जगाच्या पाठीवर कुठेही जा ,ज्यानी कुणाच ना कुणाचा आभिमान बाळगला आणि प्रेरणा घेतली तीच माणसे पुढे यशस्वी झाली. आमच्या कडे शिवाजी सारखा इतका मोठा दिव्य स्त्रोत आसताना देखिल आम्ही आपयाशी ठरलो कारण आम्ही त्यांचा इतिहास विसरत चाललोय. थेट प्रश्न विचारतो येत्या २४ Nov 2009 ला काय आहे ? तुम्हा किती जनाना ठावुक आहे ? आरे आम्हालाच माहीत नाही तर मग आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार ? आज महाराष्ट्रावर , देशावर आतेरेकी हल्ले होत आहेत.. तरीही आम्ही मात्र ग्लानी आल्या सारखे शांत पडून आहोत निंचित निपचित. ३५० वर्षा पूर्वी 'अफझल खान' नावाचा एक आतेरेकी आला होता ( जात धर्म बाबत मी बोलत नाही , या मातीचा वैरी म्हणून आम्ह्चा वैरी) तेवाच सगळ संपले आसते पण शिवरायानी ज्या हिमतीने सामना केला त्यामुले कुठे ते स्वराज्य टिकले. आम्हाला ही तसाच लढा द्यावा लागणार आहे. पण त्यासाठी आधी इतिहास आठवा आणि त्यातून काही शिका.

येत्या २४ Nov 2009 ला त्या प्रताप गडाच्या "अफझल खान " वध घटनेला ("शिवप्रताप दिन") ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. आमुक आमुक लोकांच्या भावना दुखातिल म्हणत आमचे सरकार त्याची आठवण देखिल काढनार नाही. पण तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणसाने ते विसरून चालणार नाही. अन्यथा ते रक्त सांडलेले, जिव गमावलेले आपले पूर्वज अन्यथा कधी माफ़ करणार नाहित. आता मी काही तुम्हाला "याचा द्वेष , त्याचा द्वेष करा हे म्हणत नाही . चिथावान्या द्या म्हणत नाही" उगी TV चैनल वाल्या सारखे कहिचे काही अर्थ काढू नका. पण निदान क्षण भर शिवराय आणि त्या विरांच्या पराक्रमाची आठवण तरी करा.

जय शिवराय !!!