Created On : Year 2008
Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : Its about “Chatrapati Sambhaji Raje Bhosale”. He was the son of Shivaji Raje. After Shivaji Raje’s death all enemy tried to capture maratha kingdom. But sambhaji had given them a strong fight. When he got captured by Aurangjeb , Near about 42 days he gave him hell lot of problems but sambhaji didn’t break down. This poems tell about this great warriors story ……!!
संभाजी महाराजांचा इतिहास काही जनानी हेतुपर वाईट रंगवला आहे , हे इतिहासाला आता पुरत उमगल आहे. मी कविता लिहिन तसा थांबवले होते होत , पण त्यांच्या जीवन सम्बंधिच्या वाचनातून आज लिहावासा वाटला आणि आज जवळपास २ वर्षा नंतर लिहायला घेतला , जे काही मला कळाले त्याला मी माज्या शब्दात गुफन्याचा प्रयत्न केला उन् .... तयार झाली ही कविता शंभू राजे ....!!!
शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला पुढे रेटाया आज युवराज धड़कला
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला !
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला !
एक समयी पाच पाच मोहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता !
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता !
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता !
कवडयाच्या माळीवर हात घालणार्यावर
त्या आवस्तेतही शम्भुराजा भडकला होता !!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता !
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला ,
मरता मरताही भगवा कवटाळत शम्भू राजाने " जग्दम्भ " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता !!
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!
-By Shyam Wadhekar
It ausam man........
ReplyDeleteI like very much