Wednesday, June 3, 2009

पावसातली आठवण


Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description :
If you are in deep love and if it comes to rainy season .... then what happens to you ... I think it should not be required to tell you explicitly.







वार्‍याची कोवळी झुळुक
अंगाला शहारून निघते ,
नाही नाही म्हणत मग मनही
जुन्या आठवणी उजाळत निघते ....



आठवण आली म्हणजे
तुझे हास्य डोळ्यांपुढे झिळमिळते,
काळाच्या पडद्याआड़ कोमेजलेल्या
फुलांना पुन्हा नवी पालवी फूटते .....


"भिजायचे का?" मी विचारले होते,
गालांची कळी खुलवत 
तू फक्त डोळे मिचकावले होते.
'परी'ला पावसात खेळतांना जणू पाहिले होते,
चोरून Bike च्या आरस्यातून
त्या दिवशी मी ही काही क्षण टिपले होते....


कधी हसवते, कधी रडवते
क्षण क्षण करीत चिम्ब भिझत राहाते ,
वाहून जाणार्‍या आठवणी साठवन्यासाठी
मग मन मात्र धडपडत राहाते ...


विजेच्या कड-कडाटाने मग भानावर येते
डोळ्यांच्या पापण्यांतल पाणी पुसत,
"तू नेहमी हसत राहावी"
हेच पावसाच्या प्रत्येक सरीला मागत राहाते ....
"मन" मागत राहाते ....!!!


- By : Shyam Wadhekar

No comments:

Post a Comment